#UNLOCK अमरावतीत 23 दिवसांनंतर शटर उघडलं, दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा
अमरावती जिल्ह्यत 9 मे पासून कडक निर्बंध लागू केल्याने सर्व बाजारपेठ संपूर्णतः बंद होती. आज तब्बल 23 दिवसानंतर बाजारपेठ उघडली त्यामुळे आज अमरावती शहराच्या बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल नवीन आदेश काढले. ज्यामध्ये लिहलं की, अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडन्याची परवानगी देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहील.