Amravati: दर्यापुरात 'लोणचं महोत्सव', लोणच्याचे 70 विविध प्रकार ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीच्या दर्यापुरातील नम्रता शहा गृहिणीने आपल्या परिश्रमातूनच खमंग स्वादिष्ट लोणचे बनविण्याचे ठरविले. अन्नपूर्णा कुकिंग सेंटरची स्थापना केली. या माध्यमातूनच मग केक बनविणे, बर्थ डे पार्टीची व्यवस्था करणे आदी उपक्रमातून आपल्यातील उद्योजकांच्या गुणांचा परिचय परिसराला करून दिला.अशात मुंबई येथे मॅक्सिको कंपनीद्वारे भारतातील काही वस्तू निवडण्यासाठी प्रदर्शन भरविले गेले. २०१५ ला भरलेल्या या प्रदर्शनाला उपस्थित राहून नम्रता शहा यांनी त्यांनी तयार केलेल्या काही वस्तूंसह अन्नपूर्णा आचार ठेवले. यामधून मॅक्सिको तर्फे नम्रता शहा यांचे 'अन्नपूर्णा अचार' निवडले ते एकमेव, अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे हे मोठे फळ असल्याचं नम्रता शाह यांनी सांगितलं.
Continues below advertisement