Amravati : वन कर्मचाऱ्यांनी तयार केला तलाव, शेतकऱ्यांनाही मोठा फायदा, भूजल पातळीत मोठी वाढ
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका सुंदर तलावाची निर्मिती केलीय. त्यामुळे हा तालुका पाणीदार झालाय. विशेष म्हणजे इथल्या वन्य प्राण्यांना जंगलातच जलसाठा उपलब्ध झाल्याने प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावरही बंद झालाय.