Amravati Crime: नवरदेव Sujal Samudre वर चाकू हल्ला, लग्नमंडपातच नववधू कोसळली, Drone फुटेज समोर

Continues below advertisement
अमरावतीच्या (Amravati) बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये (Sahil Lawn) सुरु असलेल्या विवाह सोहळ्यात नवरदेव सुजल राम समुद्रे (Sujal Ram Samudre) याच्यावर दोन युवकांनी धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचा ड्रोन व्हिडिओ (Drone Video) समोर आला असून, यात आरोपींची पळून जाण्याची दृश्येही कैद झाली आहेत. 'डान्स करताना झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला झाला असावा', असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात नवरदेव सुजल गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रिम्स रुग्णालयात (RIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे, तर नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नववधूही स्टेजवर चक्कर येऊन पडली. बडनेरा पोलीस (Badnera Police) घटनास्थळी दाखल झाले असून ड्रोन फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola