Amravati : झेंडा काढण्याच्या वादातून दोन गट आमनेसामने, अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू
Continues below advertisement
काल रात्री अचानक झालेल्या वादानंतर अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आलेय. काल रात्री 10 च्या सुमारास अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा काढल्याच्या वादातून दोन गट आमने सामने आले आणि वातावरण तापलं. मात्र पोलिसांना या घटनेची खबर मिळताच... त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या दोन्ही शहरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
Continues below advertisement