Amravati : अमरावतीच्या मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी 5 आरोपी ताब्यात
abp majha web team
Updated at:
10 Feb 2022 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलाखाली मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर अज्ञातांनी शाई फेकल्याने एकच खळबळ माजली आहे. राजापेठ उड्डाणपूलावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले यावेळी महीला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला.
अमरावती शहरातील राजकिय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. आज सकाळी दोन राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी एकमेकांविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन संपत नाही.. तर पुन्हा दुपारी मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर काही पुरुष-महिलांनी चक्क शाई फेकून त्यांचा निषेध व्यक्त केला.