Mahapalikech Mahasangram Amravati 'नगरसेवकच नाही, तक्रार कुणाकडे करायची?', अमरावतीतील महिलांचा सवाल
Continues below advertisement
अमरावती महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राजवट असल्याने शहराची अवस्था बिकट झाली आहे. अनेक वर्षांपासून निवडणुका न झाल्याने नागरिकांना वाली उरलेला नाही. शहरातील महिलांनी कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरील भटके कुत्रे, अस्वच्छ नाल्या आणि त्यामुळे वाढलेला सापांचा वावर यांसारख्या गंभीर समस्यांवर संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका संतप्त महिलेने आपली व्यथा मांडताना म्हटले, 'आमचं जर कुणी ऐकत असेल तर तो नगरसेवक असतो हक्काचा. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात'. या प्रतिक्रियेतून लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची होणारी घुसमट स्पष्टपणे दिसून येते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement