Amravati Car Firing : अमरावतीमध्ये कारवर गोळीबार, कुटुंबातील जण जखमी, प्रकरण काय?
Amravati Car Firing : अमरावतीमध्ये कारवर गोळीबार, कुटुंबातील जण जखमी, प्रकरण काय?
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ काल रात्री आठच्या सुमारास गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. अमरावतीवरुन अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करुन गोळीबाराची घटना घडली. दर्यापूर शहराजवळ मागून येणाऱ्या कारमधून आरोपींनी दोन राऊंड फायर केल्या. यात कारमध्ये बसलेली युवतीसह तिचे आई वडील जखमी झाले. गोळीबार करुन आरोपींनी पळ काढला. तर जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ काल रात्री आठच्या सुमारास गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. अमरावतीवरुन अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करुन गोळीबाराची घटना घडली. दर्यापूर शहराजवळ मागून येणाऱ्या कारमधून आरोपींनी दोन राऊंड फायर केल्या. यात कारमध्ये बसलेली युवतीसह तिचे आई वडील जखमी झाले. गोळीबार करुन आरोपींनी पळ काढला. तर जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.