Amravati : पांढरी खानमपूरमधील प्रवेशद्वारावर तोडगा नाही, बौद्ध बांधवांचा आयुक्तालयासमोर ठिय्या
Amravati : पांढरी खानमपूरमधील प्रवेद्वारावर तोडगा नाही, बौद्ध बांधवांचा आयुक्तालयासमोर ठिय्या
प्रवेशद्वार प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही, आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाने तीन दिवसांचा वेळ मांगीतलं त्यामुळे आज सायंकाळ पर्यंत प्रशासन काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. पांढरी खानमपूर येथील हजारो बौद्ध समाजाचे लोकं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देताय.. बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार अशी भूमिका घेतली आहे.. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.. गावात संचारबंदी लावण्यात आली आहे.. तरीही बौद्ध समाजाचे हजारो लोकं पायी अमरावती गाठत आयुक्त कार्यालय गाठलं.. अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा झाली त्यात आयुक्त मॅडम यांनी तीन दिवसांचा वेळ मांगीतला.. त्यामुळे सगळ्या बौद्ध समाजाने तीन दिवस आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या देत आहे.. काल रात्री जिल्हा प्रशासनाने आंदोलकांना पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली पण आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहे.. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावती दौऱ्यावर येताय त्यांच्यासोबत शिष्टमंडळ यांची बैठक होणार त्यात काही तोडगा निघतो हे पाहावे लागेल...