Amravati : बकरी ईदच्या शुभेच्छा फलकावर गायीचा फोटो? विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपकडून निषेध

अमरावतीच्या वरुड-मोर्शीचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या एका शुभेच्छा वरून वाद पेटला आहे. बकरी ईदच्या शुभेच्छा पोस्टमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी गाईचे फोटो टाकले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार देवेंद्र भुयार यांचा निषेध म्हणून आज वरुड येथील त्यांच्या कार्यालयावर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपने मोर्चा काढत आमदार देवेंद्र भुयार यांच्या बद्दर घोषणाबाजी केली. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले की, ही शुभेच्छा माझ्या कार्यालयातील बिनपगारी मुलानी तयार केली आणि ती शेअर केली. ही पोस्ट त्या मुलाने गुगल वरून काढले आणि त्यात माझा फोटो चिपकुन शेअर केला, त्या मुलावर कारवाई झालीच पाहीजे या मताचा मी आहे, असं ते म्हणाले. पण यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola