Amol Mitkati on Pawar : पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय?
Amol Mitkati on Pawar : पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय?
जय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. हे अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय. त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेयेय. सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होतेय. सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा होताय. त्यामुळे अजित पवारांसंदर्भात त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रात लक्ष असल्याचं संजय राऊत म्हणालेय. दरम्यान, पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय?, असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केलाय. दरम्यान, आज अकोल्यात बाहुबली हिंदू संमेलनासाठी येत असलेल्या नितेश राणेंनाही आमदार मिटकरी यांनी टोला लगावलाय. आपल्या वक्तव्यातून अकोल्यातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाहीय, याची काळजी नितेश राणे यांनी घेण्याचा सल्ला आमदार मिटकरींनी राणेंना दिलाय. दरम्यान, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आमदार मिटकरी यांनी परत एकदा जोरदार टीका केलीये. उद्या विखे पाटील स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाला अकोल्यात येणार नाहीयेत. विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा 'लाडका जिल्हा' नाही का?, असा सवाल त्यांनी विखे पाटलांना केलाय. अकोला जिल्हा विखे पाटलांसाठी 'सावत्र जिल्हा' झालाय का?, असा सवाल आमदार मिटकरींनी विखे पाटील यांनी केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोने यांनी...