Amol Mitkari Vs Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी देशाची माफी मागावी, अमोल मिटकरी संतापले

Continues below advertisement

ठाणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून शैक्षणिक अभ्यासक्रमात मनृस्मृतीचा सहभाग होण्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीयमंत्री रामदास आठवले  (Ramdas Athwale) यांनीही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करुन चर्चा केली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी, मनुस्मृतीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सहभाग करण्याचा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अद्यापही याप्रकरणावरुन राजकारण होत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी मनुस्मृती प्रकरणावरुन थेट महाडमधील ऐतिहासिक चवदाळ तळ्यावर जाऊन आंदोलन केले. त्यावेळी, मनुस्मृती फाडताना डॉ. बाबासाहेब यांचा फोटो फाडला गेल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, आव्हाड यांनीही घडलेल्या घटनेवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, मनुस्मृतीवर तुमचं काय म्हणणं आहे, असा सवालही आव्हाड यांनी विचारला.  

जितेंद्र आव्हाड यांनी महाड तळ्यावर जाऊन पाणी प्यायले. त्यानंतर, तेथे भाषण करताना काही लोकं महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचं त्यांनी म्हटलं. अनेक समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यावेळेस मनोस्मृतीला विरोध केला आहे. विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून झोपा काढणे, क्रोध, द्वेष निंदा या गोष्टी मनोनी स्त्रियांना दिलेल्या आहेत.  1927 च्या मनोवादी आंदोलनात लढा देणाऱ्या इतर जातीतील लोकांच्या घरावर दहा वर्षे बहिष्कार टाकण्यात आला. मनुला आई वडील होते की नाही, असे म्हणत आव्हाड यांनी यावेळी मनुस्मृतीतील श्लोकांचे वाचनही केले. तसेच,काही निवडक लोकं महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. एकीकडे संविधान बदलण्याचे कारनामे सुरू आहेत असे म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram