Jitendra Awhad Mahad : महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचं दहन

Continues below advertisement

राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तसेच मनुस्मृतीतील शोल्कांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच निर्णयाला आता अनेक स्तरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे. त्यांनी आज (29 मे) आज थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आव्हाड यांच्याकडून सरकारच्या निर्णयाला विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा थेट विरोध केला आहे. या निर्णयाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांनी थेट भूमिका घेतली. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करू, असे आव्हाड यांनी जाहीर केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. त्यामुळे मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करण्यासाठी आव्हाड यांनीदेखील हेच स्थान निवडले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram