NCP Reshuffle: 'दादांवर तटकरेंची सरशी?', मिटकरी-ठोंबरेंना डच्चू, अंधारेंच्या विधानाने खळबळ
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी संघटनात्मक फेरबदल करण्यात आली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून काढून टाकले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले आहे की, 'कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकावर सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) पूर्णपणे सरशी केली आहे की काय?' राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधातील भूमिकेमुळे ठोंबरेंना पदावरून दूर करण्यात आल्याची चर्चा आहे, तर भाजपविरोधी वक्तव्यांमुळे मिटकरींना फटका बसल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, मारहाण प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना प्रवक्तेपदी कायम ठेवून अजित पवारांनी विश्वास दाखवला आहे. या निर्णयावर अमोल मिटकरी यांनी 'दुनिया दौडण्या वालों की है, लेकिन मंजिलें सब्र वालों को मिलती है,' अशी सूचक पोस्ट केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातही वाद पेटला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement