Amol Mitkari On Nawab Malik : नवाब मलिकांसोबत राष्ट्रवादी पक्ष - अमोल मिटकरी Abp Majha
Amol Mitkari On Nawab Malik : नवाब मलिकांसोबत राष्ट्रवादी पक्ष - अमोल मिटकरी
Maharashtra Assembly Winter Session 2023, Day 2: नागपुरात (Nagpur News) हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता मलिक कसे चालतात? असा सवाल करत सभागृहात ठिणगी पडली. आज हीच ठिणगी वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. मलिकांना भाजपात सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलं पत्र जारी करत अजितदादांना (NCP Ajit Pawar) केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.