Amol Mitkari on Ajit pawar: अजितदादांनाही विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळू दे, मिटकरींचं साकडं
Amol Mitkari on Ajit pawar: अजितदादांनाही विठुरायाच्या शासकीय पूजेचा मान मिळू दे, मिटकरींचं साकडं
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य. पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी संपत निक करावी असं विठ्ठलाला साकडं घातल्याची अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातल्या आरोग्य नगर भागातील निवासस्थानी आली होती रूपनाथ महाराजांची पालखी. मिटकरींनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना राज्याचं लवकरच मुख्यमंत्री कर अशी केली आराधना. मिटकरींनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचं केलं सहपरिवार स्वागत. पत्नीसह घातली पालखीत फुगडी.
दरम्यान मिटकरींच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता. या आधी अनेकदा अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलून दाखवली होती इच्छा.