Alandi Pandharpur Wari 2025 : माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान;मुख्य मंदिरात अलोट गर्दी
Alandi Pandharpur Wari 2025 : माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान;मुख्य मंदिरात अलोट गर्दी
त ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीचा आज पुण्यात संगम होतो. संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं. तिथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसर मधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यानंतर या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. त्यामुळं आजचा दिवस या दोन्ही पालख्या आणि वारकाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदीतील गांधी वाड्यातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल. वारकऱ्यांनी धरला फेर, फुगड्या आणि नामघोष आळंदीत भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि 'ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष सुरू आहे. पालखीसमवेत जाण्यासाठी वारकरी दाखल झाल्याने अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून निघाली आहे. फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानापूर्वीचा मनसोक्त आनंद लुटत होते.