Amol Mitkari on Suresh Dhas : मी केलेल आरोप खोटे असतील तर, सुरेश धसांनी स्पष्ट करावं

Continues below advertisement

Amol Mitkari on Suresh Dhas : मी केलेल आरोप खोटे असतील तर, सुरेश धसांनी स्पष्ट करावं

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर 'एबीपी माझा'शी बोलतांना अत्यंत गंभीर आरोप केले होतेय. या आरोपावर काही बोलायला सुरेश धस यांनी सर्वात आधी नकार दिला होताय. यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपण बोललेलं खोटं आहे का?, सुरेश धसांनी स्पष्ट करावं असं म्हटलंय. आपले आरोप खोटे असतील तर सुरेश धस त्यावर का बोलत नाही?, असा सवाल त्यांनी केलाय. 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी सुरेश धस आणि वाल्मीक कराडला कशासाठी फोन केला होताय?, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी मिटकरींनी केलीय. आपण आज सुरेश धसांवर केलेल्या आरोपांसंदर्भात लवकरच गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचा ते म्हणालेय. धनंजय मुंडेंना मंत्री केल्यामुळेच सुरेश धस यांचा पोटशुळ उठल्याचं मिटकरी म्हणालेत. सुरेश धसांनी मतदारसंघातील विकास कामांच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना भेटतांना खरं कारण लपवू नये असा टोला त्यांनी लगावला. 

दरम्यान प्राजक्ता माळी आणि अजित पवारांसंदर्भात सुरेश धसांच्या दिलगिरीवरही त्यांनी टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांनी घसांचे कान पिळल्यामूळेच त्यांना माफी मागावी लागली असे म्हणालेय. अजित पवारांवर टीका करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांवरही मिटकरींनी जोरदार टीका केलीय. जे क्षीरसागर आपले वडील आणि काकाचे झाले नाहीत त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram