Amol Mitkari Akola : आधी माफी मागा मगच एकीकरणाची चर्चा, मिटकरींनी सांगितल्या युतीच्या अटी-शर्ती
Amol Mitkari Akola : आधी माफी मागा मगच एकीकरणाची चर्चा, मिटकरींनी सांगितल्या युतीच्या अटी-शर्ती
: आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबद्दल वक्तव्य केल्याचं अजित पवार यांनी म्हटल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेय. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जातंय. मात्र पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलीये. यासंदर्भातील सूत्रांच्या हवाल्याने दाखविल्या जात असलेल्या बातम्या धादांत खोट्या असल्याचं मिटकरी म्हणालेत. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आमदार अमोल मिटकरीही मुंबई येथे उपस्थित होतेय. दरम्यान, पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेरीत असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी केलीये. पक्षातील बैठकीतल्या न झालेल्या चर्चांच्या खोट्या बातम्या बाहेर पेरणाऱ्या सूत्रांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी अजित पवारांकडे करणार असल्याचा आमदार मिटकरी म्हणालेत. पक्षाने हे घरभोदी शोधण्याचं आवाहन त्यांनी केलंय.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. अजित दादांवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी सर्वात आधी त्यांची माफी मागावी. त्यानंतरच एकीकरणावर चर्चा होणार असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत. यासोबतच दोन्ही पक्ष एकत्र हे अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये. शरद पवार हे देशाचे, राज्याचे आणि पक्षाचे कायम मार्गदर्शक आहेत असंही ते म्हणालेत. आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोने यांनी...