ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 14 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 14 May 2025
भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या ११ एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख, उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाईटनं टिपलेले फोटो समोर, पाकिस्तानकडूनही कबुली
भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार, जैशचं मुख्यालय,लश्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना एकेक कोटींची मदत..
जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त, एके ४७ रायफली, हातबॉम्ब, काडतुसं हस्तगत, थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद
२२ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे जवान पीके साहू भारतात सुखरूप परत, अटारी वाघा सीमेवरुन साहू मायदेशात
मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शाहांनी मागितली माफी, मोदींनी नारीशक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना म्हणाले होते दहशतवाद्यांची बहिण, टीका झाल्यावर म्हणतायत सोफिया माझी सख्खी बहिण...
ऑपरेशन सिंदूरचंं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी तर मुंबईत मुख्यमंत्र्यासह भाजप नेते सहभागी होणार...