घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी अमोल कोल्हे जातायत एकांतवासात! Facebook post व्हायरल
Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे काही काळासाठी एकांतवासामध्ये जात आहेत. तसं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून सांगितलं आहे. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन आणि चिंतनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि फेरविचार करणार असल्याचं त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement