Sharad Pawar Govind Baug : बारामतीत दिवाळी, शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी
Sharad Pawar Govind Baug : बारामतीत दिवाळी, शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी
शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते. पवार प्रेमी राज्यभरातून बारामती मध्ये शुभेच्छांचा शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात. परंतु आजच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली गोविंद बागेत पाहायला मिळते. गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानातून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
हे ही वाचा...
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातून (Naigaon Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर (Shirish Gorthekar) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. गोरठेकरांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या बंडामुळं नायगाव मतदारसंघात काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसणार आहे.
शिरीष गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव आहेत. नायगाव मतदारसंघात गोरठेकर यांची मोठी ताकद आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती. पण ही जागा काँग्रेसला सुटली आहे. त्यामुळं काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं शिरीष गोरठेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. माघार घेतील अशी अपेक्षा होती. मात्र समर्थकांची बैठक घेऊन त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.