
Amit Thackeray भाजपच्या कोट्यातून आमदार? Devendra Fadanvis - Raj Thackeray भेटीत काय-काय ठरलं?
Amit Thackeray भाजपच्या कोट्यातून आमदार? Devendra Fadanvis - Raj Thackeray भेटीत काय-काय ठरलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत.
भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं भाजप काही जागा मनसेला सोडू शकतं, अशी माहिती आहे. अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करुन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का ते पाहावं लागेल.