Amit Shah Shirdi : अमित शाह यांनी घेतलं साईबाबांचे दर्शन, तिन्ही मंत्री उपस्थित FULL VIDEO
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डी येथील साई मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर भाजप नेत्यांसह साई दर्शन घेतले. काल त्यांनी महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेतली होती. आज ते कोपरगाव येथील सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असून, त्यांना केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री असल्याने त्यांच्याकडून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, विखे पाटील यांच्या कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटनही ते करतील. कोपरगाव येथील शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि मदतीबाबत अमित शहा काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement