Amit Shah Shirdi Visit | केंद्रीय गृहमंत्री Amit Shah महाराष्ट्रात, शिर्डीत कडेकोट बंदोबस्त

Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल शिर्डीत त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. आज अमित शहा साईबाबांचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडसह मंदिराची पाहणी सुरू आहे. विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीत कामाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही ते करतील. त्यानंतर शेतकरी मेळाव्यालाही अमित शहा उपस्थित राहणार आहेत. कोपरगाव येथील सहकार आणि शेतकरी मेळाव्यालाही ते संबोधित करतील. सकाळी अकरा वाजता अमित शहा साई मंदिरात पोहोचतील आणि पाद्यपूजा व आरती करतील. त्यानंतर ते लोणीकडे रवाना होतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola