Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल, एअरपोर्टवरुन गुलटेकडीकडे रवाना

Continues below advertisement

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल, एअरपोर्टवरुन गुलटेकडीकडे रवाना

उद्याच्या सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात दाखल झालेत.  पुणे एअरपोर्टवरुन ते थेट गुलटेकडी भागात असलेल्या नातेवाईकांच्या घरी गेलेत.  तिथून ते मॅरिएट हॉटेलमधे येणार आहेत.  अमित शाह जेव्हा मॅरिएट हॉटेलमधे येतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.  दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशीरा मॅरिएट हॉटेलमधे पोहचणार आहेत.  उद्या पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात अमित शाहांच्या हस्ते केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून आंतरराज्यीय वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram