Amit Shah on Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र

मुंबई : जे सरकार काम करत तेच निवडणुक जिंकतात, देशात आपण सलग तिसरे सरकार बनवले. आता आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असं सांगत महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी व्यक्त केला. यंदा राज्यात महायुतीचे सरकार येईल, पण 2029 साली एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे असंही अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सूचना दिल्या. 

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं अमित शाह म्हणाले. महाराष्ट्रात सत्ता आल्यास समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही असंही अमित शाह म्हणाले. 

महाराष्ट्राची विधानसभा महायुतीत जिंकेल

अमित शाह म्हणाले की, गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तीन वेळा सरकार बनविण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती जिंकणार. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola