Amit Shah : Bharatiya Nyaya Sanhita लोकसभेत मंजूर, अमित शाहांनी मांडली तीन विधेयकं
Amit Shah : Bharatiya Nyaya Sanhita लोकसभेत मंजूर, अमित शाहांनी मांडली तीन विधेयकं
आता एक अतिशय महत्त्वाची बातमी.. स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षांनी भारताला नवा गुन्हेगारी कायदा मिळणार आहे. १८६० साली अमलात आलेल्या भारतीय दंडसंहितेच्या जागी नवे कायदे आणण्याच्या दिशेनं आज आणखी एक पाऊल टाकण्यात आलं. गुन्हेगारी कायद्याशी संबंधित तीन विधेयकं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी लोेकसभेत मांडली, आणि तिन्ही विधेयकं मंजूर करण्य़ात आली. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष विधेयक या तीन विधेयकांना लोकसभेनं मंजुरी दिली. महत्त्वाचं म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. तर दुसरीकडे मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यात फाशीची तरतूद करण्यात आली आहे. ही तिन्ही विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती. आज त्यांची सुधारित आवृत्ती मांडण्यात आली.