Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती

Continues below advertisement

Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती

 कौशल (Vicky Kaushal), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं. काही वेळातच ट्रेलरवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. पण, सगळीकडून उदो उदो सुरू असतानाच अखेर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाच. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. आता याचप्रकरणी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी चित्रपटाबाबतच्या कॉन्ट्रोवर्सीबाबत राज ठाकरेंचा सल्ला घेतल्याचं सांगितलं. तसेच, ज्या लेझीम खेळतानाच्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो डिलीट करणार असल्याचंही दिग्दर्शकांनी सांगितलं. 

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला आगामी 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. पण, रिलीजपूर्वीच कॉन्ट्रोवर्सीत अडकल्यामुळे आता चित्रपटाची रिलीज डेटही पुढे जाण्याची शक्यता आहे. अशातच आता यावर चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी 'राज'मार्ग निवडला असून थेट शिवतीर्थावर धाव घेतली आहे. 'छावा'वरुन निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीवर तोडगा काढण्यासाठी दिग्दर्शकांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 

'तो' सीन डिलीट करणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. ते बदल आम्ही करणार आहोत. तसेच, ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram