America Women Case : अमेरिकी महिला मानसिक रुग्ण असल्याचं तपासात समोर

Continues below advertisement

America Women Case : अमेरिकी महिला मानसिक रुग्ण असल्याचं तपासात समोर

सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोनापाल जंगलात साखळदंडात जखडलेल्या स्थितीत सापडून आलेल्या अमेरिकन महिलेचा तो बनावच असल्याची दाट शक्यता   मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत तिने स्वत:हुन हा प्रकार करून घेत समाजासह पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचे एकंदर तपासकामामध्ये पुढे   अमेरिकन महिलेला सोनुर्ली रोनापाल जंगलातून ताब्यात घेतल्यानंतर तिने दिलेल्या एकमेव  महिलेने जबाबात नवऱ्याने आपणास या जंगलात आणून बांधून ठेवल्याचं आणि आपणास उपाशी ठेवून आपला शारीरिक छळ केल्याचे म्हणंटलं होतं..  या तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला. परंतु आठवडाभराच्या तपासात 'त्या' महिलेने दिलेल्या पत्त्यावर तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले, त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आढळून आले नाही.   एवढेच नव्हे, तर तिने तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट पत्ता दिला होता, त्या पत्यावर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले.   तसेच काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात आणि अन्य रुग्णालयात तिच्यावर मानसिक उपचार झाल्याचे देखील उघडकीस आले आहे  आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सदर महिले जवळील मोबाईल व टॅबवर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला, तिथे ती एकटीच आढळून आली आहे.   त्यामुळे ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला, तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे.   वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस असं काहीही स्पष्ट केलेलं नाही.   या महिलेला आता अधिक उपचारा करिता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयात पाठविण्यात आले आहे.   या ठिकाणी ती महिला ज्यावेळी औषधोपचार घेऊन पूर्ववत मानसिक स्थितीत येईल त्यावेळीच यावर स्पष्ट असा खुलासा होऊ शकतो.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram