Ambernath Tragedy: शिंदेंच्या कार्यक्रमाला रुग्णवाहिका, महिलेचा मृत्यू?

Continues below advertisement
अंबरनाथमध्ये (Ambernath) मीना सूर्यवंशी (Meena Suryavanshi) या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका (Ambulance) पाठवल्यामुळे मीना सूर्यवंशी यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. सूर्यवंशी यांना तातडीने मुंबई किंवा ठाण्यातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याची गरज होती, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांची प्रकृती गंभीर होती आणि १५ मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे रुग्णवाहिका न मिळाल्याचा आरोप तथ्यहीन आहे,' असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. हा प्रकार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी घडला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola