Viay Wadettiwar : शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशी परिस्थिती
Continues below advertisement
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) मुद्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'तुम्हाला मुंबईच्या उलाढालीवर, दहा हजार कोटींवर तुमची बुरी नजर, वाईट नजर त्यावर आहे,' असा गंभीर आरोप दानवे यांनी केला. दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. कापूस खरेदीसाठी सीसीआयने (CCI) घातलेल्या अटींमुळे आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्धवस्त होत असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंडळ बरखास्त करून पणन मंत्र्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती मंत्र्यांना 'मलिदा खाण्यासाठी' केली आहे, असा आरोप करत दानवे यांनी सरकारचा निषेध म्हणून दिवाळीत एक तास दिवे बंद ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement