Voter List Row: 'सत्तेसाठी प्रत्येक ठिकाणी धर्म शोधतात', मतदार यादीतील हस्तक्षेपावरून BJP वर निशाणा
Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून राजकारण तापले असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. 'सत्तेवर येण्यासाठी ते (भाजप) फक्त जातीय कार्डच वापरतात,' असा थेट आरोप दानवे यांनी केला आहे. शेतकरी आणि विकासासारखे मुद्दे बाजूला ठेवून आता मतदार यादीमध्येही धर्म शोधला जात आहे, हे सर्वात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. भाजपने मतदार यादीत दुबार नावे असल्याचे मान्य केले आहे, यावर बोट ठेवत, आमची मागणी फक्त दुबार नावे वगळण्याची आहे, आम्ही त्यात कोणताही धार्मिक रंग देत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि प्रभाग रचनेतील हस्तक्षेपावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, निकोप निवडणुकांसाठी न्यायालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement