JNUSU Elections: JNU मध्ये आज मतदान, डाव्या संघटना आणि ABVP मध्ये प्रमुख लढत

Continues below advertisement
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थी मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीतील प्रमुख लढत डाव्या संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर अपेक्षित आहे. यंदाची निवडणूक पारंपारिक बॅलेट पेपरच्या सहाय्याने होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण याला अनेकदा देशातील तरुण पिढीच्या वैचारिक प्रवाहाचे प्रतिबिंब मानले जाते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola