Political Firecrackers: Eknath Shinde म्हणजे फुसका आणि रुस्का फटाका, Ambadas Danve यांची बोचरी टीका
Continues below advertisement
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'राजकीय आतषबाजी' करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदिपान भुमरे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'एकनाथ शिंदे म्हणजे फुसका आणि रुस्का फटाका, काही झालं की रुसून गावाकडे जातात,' अशा शब्दात दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांना 'भुईचक्कर' संबोधतानाच, दिवाळीनंतर त्यांच्याविरोधात 'दीडशे कोटींचा बॉम्ब' फोडणार असल्याचा इशाराही दानवे यांनी दिला. अजित पवारांची 'सुरसुरी' फटाक्याशी तुलना करत ते फक्त स्वतःच्या सत्तेपुरता विचार करतात, असे म्हटले. तर, संजय राऊत यांना 'टायगर बॉम्ब', उद्धव आणि राज ठाकरेंना 'सुतळी बॉम्ब' तर आदित्य आणि अमित ठाकरेंना आकाशात उंच जाणारे 'टॉप कोर' रॉकेट दिले. पंतप्रधान मोदींना 'छोटे पल्ल्याचे रॉकेट' आणि छगन भुजबळ यांना 'टिकलीची बंदूक' देत दानवेंनी राजकीय फटकेबाजी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement