ECI Meeting: 'निवडणूक आयोग दबावाखाली, निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत', विरोधकांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मतदार याद्यांमधील त्रुटी, दुबार नोंदणी आणि VVPAT मशीनच्या अनिवार्य वापराबाबतचे मुद्दे मांडण्यात आले. 'निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचे काम करत आहे आणि सरकारच्या दबावाखाली काम करत आहे', असा थेट आरोप नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. शिष्टमंडळाने सांगितले की, मतदार याद्या शुद्ध करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे, मात्र आयोग ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यादीतील गंभीर त्रुटी पुराव्यानिशी दाखवूनही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणताही तोडगा काढण्यास नकार दिल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. आता मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचेही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement