Delhi : अमर जवान ज्योत युध्द स्मारकात विलीन,राहूल गांधी यांची सरकारवर टीका : ABP Majha

Continues below advertisement


दिल्लीत इंडिया गेटवर 50 वर्षांपासून तेवत असलेली अमर जवान ज्योत आज राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलिन झालीय.  यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केलीय. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा तेवत ठेवू, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तर सरकारनं त्यांना उत्तर दिलंय. ज्यांनी 7 दशकं राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवलं नाही, तेच लोक आमच्या शहिदांना स्थायी आणि उचित श्रद्धांजली वाहण्यावरून गदारोळ करत आहेत, असं प्रत्युत्तर सरकारनं दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram