Delhi : उत्तरप्रदेशच्या तरूणांसाठी कॉंग्रेसनं घोषणापत्र जाहीर केलयं : ABP Majha
उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी काँग्रेसने घोषणापत्र जाहीर केलंय. उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी वीस लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन काँग्रेसने दिलंय. यापैकी आठ लाख नोकऱ्या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या तरुणांसोबत संवाद साधत त्यांचे विचार घोषणापत्रात सामील करण्यात आलेत.