Ravindra Dhangekar : पुण्यात पोलीसच गुन्हेगारांच्या सेवेत? PI वर गंभीर आरोप
Continues below advertisement
पुण्यातील एका पोलीस निरीक्षकावर (Police Inspector) गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका लोकप्रतिनिधीने PI देशपांडे आणि समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'मी दहा टक्केच बोलतोय, देशपांडे पीआयनी खोटा गुन्हा का दाखल केला? हे ते बिंग आज मला उघडायचं आहे,' असा थेट इशारा या लोकप्रतिनिधीने दिला आहे. त्यांच्या मते, वरिष्ठ निरीक्षक देशपांडे हे खोटे गुन्हे दाखल करून गुन्हेगार टोळ्यांना पोषक वातावरण निर्माण करून देत आहेत. तर, समीर पाटील हा पोलीस चौकीमध्ये गुन्हेगारांसाठी मॅनेजमेंटचे काम करतो. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे चांगले अधिकारी असले तरी, विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये चुकीची कामे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या अधिकाऱ्याला राजकीय कवच असल्यामुळे तो वाचत आहे, पण ज्या दिवशी हे कवच बाजूला जाईल, त्या दिवशी संपूर्ण सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement