Chhagan Bhujbal : इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यत  सर्व निवडणुका पुढे ढकलाव्यात - भुजबळ ABP MAJHA


मागासवर्गीय आयोगानं आपलं काम जलदगतीने केले तर ओबीसींना राजकीय आरक्षण शक्य असल्याचे  मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कोणत्याही सरकारची चूक असली तरी लोकांची काय चूक असंही भुजबळ यावेळी म्हणाले. येणाऱ्या निवडणुका जनरलमधून होतील, मात्र, पुढच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता सर्व अधिकारी, सचिवांसह  संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणावर मार्ग निघत नसेल तर आंदोलन उभ राहिल, त्यामध्ये आम्हीपण सामील होऊ असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola