OBC Reservation : केंद्रानं डेटा द्यावा अन्यथा निवडणुका पुढे ढकलाव्या : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Continues below advertisement
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या भूमिकाला सुप्रीम कोर्टाने एकामागोमाग एक धक्के दिले आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने आधी राज्य सरकारने केंद्राकडे केलेली इम्पिरिकल डेटाची मागणी फेटाळली. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश रद्द केला आहे. त्यामुळे आता 21 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समिती आणि राज्यातील 105 नगरपंचायतीमधील निवडणुकांमधील ओबीसींसाठी ज्या जागा राखीव ठेवल्या होत्या, त्या आता खुल्या प्रवर्गाअंतर्गत येतील. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court Election Obc Obc Reservation Dilip Walse-patil Maharashtra OBC Reservation Maharashtra OBC Quota Obc Obc Reservation Quota Other Backward Class