Alka Kubal Jalgaon : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर अलका कुबल यांनी व्यक्त केला संताप

Alka Kubal Jalgaon : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर अलका कुबल यांनी व्यक्त केला संताप

बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर,मुलींनी अशा बापाचा खूनच करायला पाहिजे,अभिनेत्री अलका कुबल यांची संताप जनक प्रतिक्रिया  महिलांवर अत्याचार रोखायचे असतील तर आखाती देशा प्रमाणे कठोर कायदे असायला हवे,त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा,अशी उद्विग्न होत संताप जनक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगाव मधे दिली आहे.  जळगावमध्ये झालेल्या खानदेश करिअर महोत्सव निमित्ताने अभिनेत्री अलका कुबल या जळगाव मधे आल्या होत्या,त्यावेळी  अनेक सामाजिक आणि कौटुंबिक विषयांना स्पर्श करणारी  मुलाखत त्यांनी माध्यमांना दिली आहे.अलकाताईं कुबल यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अर्चना सूर्यवंशी यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना सांगितले की,पालकांनी प्रत्येक मुलाचा कल ओळखणे आवश्यक आहे. फक्त इंजिनिअर, डॉक्टर किंवा वकील बनणे हेच ध्येय नसावे. शेती, नर्सिंग, शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातही मुलं उजळू शकतात.या कडे ही लक्ष द्यायला हवे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola