Ajit Pawar Pune PC : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? दादांकडून सविस्तर उत्तर

Ajit Pawar Pune PC : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? दादांकडून सविस्तर उत्तर


एसटीला कोरोना काळातही त्यांना तोटा झाला होता..तेव्हा दर महिन्याला 250 ते 300 कोटी आम्ही बजेटमधून द्यायचो आणि चालवायचो आता आपण महिलांना, ज्येष्ठांना, दिव्य़ांगांना, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवलती देतो त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो.. त्याकरता आम्ही बजेटमधे तरतूद करतो प्रताप सरनाईकांनी यापुर्वीही मला भेटून अनेक प्रस्ताव दिले होते.. देशात आणि जगात कुठेही पब्लिक ट्रान्स्पोर्ट फायद्यात नसते ही माझी माहिती आहे (चुकीची असल्यास मी वक्तव्य मागे घेईन) सामान्य लोकांना चांगल्याप्रकारे सोयी देण्यात याव्यात हा आमचा प्रयत्न असतो परिवहन विभागाच्या जागा अनेक शहरांत मोक्याच्या ठिकाणी आहे...त्या बीओटी तत्वावर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवायचा आमचा मानस आहे मात्र आमच्या लक्षात आलं हे धोरण ३० वर्षांपुर्वीचं आहे, त्यामुळे हे धोरण आता बदलण्यासाठी या कॅबिनेटमधे  नवीन प्रस्ताव  देण्याबद्दल मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola