Akshay Shinde Encounter  : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडून होणार

Akshay Shinde Encounter  : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडून होणार 
 बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे... सीआयडीसोबतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे.. "सीआयडी अधीक्षक नवी मुंबई" हे तपास पथकाचे प्रमुख असतील.. आजच सीआयडीचं पथक ठाण्यात दाखल होणार आहे..  दुसरीकडे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं  जे.जे.रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय.. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरु असताना व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं. अक्षय शिंदेचे फिंगर प्रिंटसही घेण्यात आले आहेत.. तिकडे फॉरेन्सिक टीमनं ज्या पोलीसांच्या गाडीत अक्षयचा एन्काऊंटर झाला त्या गाडीची पाहणी केली.. तसंच मुंब्रा बायपासजवळच्या घटनास्थळाचीही पाहणी केली...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola