Akshay shinde Case Update : अक्षय शिंदे प्रकरणात नव्यानं एफआयआरची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
Akshay shinde Case Update : अक्षय शिंदे प्रकरणात नव्यानं एफआयआरची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी (Akshay Shinde encounter case) नव्याने FIR दाखल करायची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळं राज्य सरकारला (state Govt) दिलासा मिळाला आहे. SIT पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल. तक्रारदारांनी ( अक्षय शिंदे कुटुंबीय ) स्वतः याचिका मागे घेतली आहे. त्यामुळं त्यांना नोटीस जारी करण्याची आवश्यकता नाही असे न्यायालयानं म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आम्ही बदल करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे.
पोलीस महासंचालक SIT स्थापन करतील. अधिकाऱ्यांची निवड पोलीस महासंचालक करतील. पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली SIT काम करेल. तक्रारदार मजिस्ट्रेट किंवा सत्र न्यायालयात दाद मागू शकतात असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.