Dilip Lande : कुर्ला अंधेरी लिंक रोडवर सफेद पूल अखेर वाहतुकीस खुला
Dilip Lande : कुर्ला अंधेरी लिंक रोडवर सफेद पूल अखेर वाहतुकीस खुला
कुर्ला अंधेरी लिंक रोड वर सफेद पूल येथील मिठी नदीवर असलेला पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे.स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन पार पडले. कुर्ला अंधेरी लिंक रोड वर या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. तसेच जुना पूल हा अरुंद आणि जुना असल्याने इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही होत होती. मात्र आता हा कुर्ला अंधेरी लिंक रोड वरील हा महत्त्वाचा पूल वाहतुकीस खुला झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी अतिशय कमी होईल आणि पावसाळ्यात ही या विभागाला पाणी भरण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नसल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले.