Akola : कालिचरण महाराजांविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह, पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Updated at:
27 Dec 2021 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWho is Kalicharan Maharaj : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल झालेत. रायपूरमधील धर्मसंसदेत केलेल्या भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधींवर टीका करताना त्यांनी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. कालिचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे रहिवाशी आहेत. अकोला जुने शहरातील शिवाजीनगर भागातल्या भावसार पंचबंगल्याजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. बालपणीच अध्यात्माकडे वळलेल्या कालिचरण यांचं मूळ नाव अभिजीत सराग असे आहे.