Fraud Alert: स्वस्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक, महिलेला १ कोटींचा गंडा
Continues below advertisement
अकोल्यामध्ये (Akola) स्वस्त दरात सोनं देण्याचं आमिष दाखवून एका महिलेची तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक (Gold Fraud) करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर (Amol Nerkar), मनोहर नेरकर (Manohar Nerkar), प्रेम गावंडे (Prem Gawande) आणि नितेश महाले (Nitesh Mahale) या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विश्वास संपादन करून सुरुवातीला खरं सोनं दिलं आणि नंतर नकली सोने व चांदी देऊन दीड वर्षात एक कोटी चौदा लाखाची फसवणूक केली.’ . आरोपींनी सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी महिलेला खरं सोनं दिलं आणि नंतर बनावट सोनं देऊन फसवणूक केली. पोलिसांनी आरोपींकडून ६१ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सुमारे ५१५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. . पीडित महिलेकडून मिळालेल्या पैशातून आरोपींनी खरं सोनं विकत घेऊन ते बुलढाणा (Buldhana), खामगाव (Khamgaon) आणि अकोल्यासह विविध भागांतील ज्वेलर्सकडे गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. .
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement