Akola Election : मतदान केंद्रावर 85 मतदारांची नावं गहाळ, मतदान केंद्राच्या चुकीच्या क्रमांकामुळे मनस्ताप
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी आज मतदान होतंय. अकोला जिल्ह्यातील पळसोबडे मतदान केंद्रावर अनेक मतदाराची नावे गहाळ झाल्याचा प्रकार समोर आलाय. जवळपास 85 मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झालीयत. अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या चुकीच्या क्रमांकामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागलाय. पळसोबडे हे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं गाव आहेत.