Akola : अकोल्यात शेतमाल चोरण्यासाठी रचला स्वत:च्याच अपघाताचा डाव

Continues below advertisement

Akola : अकोल्यात शेतमाल चोरण्यासाठी रचला स्वत:च्याच अपघाताचा डाव अकोल्यात चोरीचा आगळंवेगळ प्रकरण समोर आलंय. एका ट्रक मालकानं आपल्या गाडीतून भाड्यानं इंदौरला नेण्यात येणार्या शेतमाल चोरीसाठी त्यानं स्वतःच्याच अपघाताचा बनाव रचलाय. मात्र अकोला पोलिसांच्या तपासात सर्व प्रकरण उघडकिस झालंय. आता ट्रक चालक-मालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे. श्रीकृष्ण लटपटे असं या आरोपीचं नाव आहेय. श्रीकृष्णनं थेट ट्रकमधील तुर चोरण्यासाठी स्वताचा अपघाताचा बनाव रचला. त्याने ट्रक हा मेळघाटातील दरीत टाकत अपघाताचा बनाव रचलाय. नंतर त्यानं ट्रक पेटवूनही दिलाय. जिल्ह्यातल्या चोहोट्टा येथील राधेश्याम पाटकर यांनी याप्रकरणी तक्रार दिलीय. मध्यप्रदेशातल्या इंदौर इथल्या दालमिलमध्ये  148 क्विंटल 'तूर' विक्रीसाठी श्रीकृष्णचे वाहन भाड्याने घेतले होतेय. दहीहांडा पोलिसांनी आरोपीसह वाहन आणि 148 क्विंटल तूर जप्त केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram